Banganga Lake Mumbai: ऐतिहासिक 'बाणगंगा'ला आता लोखंडी जाळ्यांची तटबंदी; नागरिक, राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर महापालिकेला जाग

तलावाचे पावित्र्य राखण्यास मदत
Banganga Lake Mumbai
Banganga Lake MumbaiPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: पितृपक्षातील विधींनंतर बाणगंगा तलावात मासे मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तलावाच्या किनारी होणारे विधी पिंडदानामुळे पाणी दूषित झाल्यामुळेच माशांचा जीव गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता.

Banganga Lake Mumbai
Mumbai Share Trading Fraud: आधी नफ्याचे पैसे दिले, नंतर कोट्यवधींचा गंडा! मुंबईतील व्यावसायिकाची ४.९२ कोटींची फसवणूक

स्थानिकांच्या तक्रारीनंतर प्रसारमाध्यमांनी देखील यावर आवाज उठवला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बाणगंगा तलावाभोवती लोखंडी जाळ्यांची तटबंदी बांधली आहे.

मनसेसह उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या प्रकरणात उडी घेतल्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.

Banganga Lake Mumbai
Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी लोकलचे वेळापत्रक बदलणार! मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, प्रवासापूर्वी वाचा

सर्वपित्री अमावस्येनिमित्त दरवर्षी उत्तर भारतीयसह विविध समाजातील लाखो मंडळी ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात पितरांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण विधी करण्यासाठी येतात.

विधी झाल्यानंतर तांदळाच्या पिठाचे गोळे, तेल आणि केस बाणगंगेत अर्पण करतात. यामुळे बाणगंगा तलावत दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊन लाखो माशांसह इतर जलचरांचा मृत्यू होतो.

हे सर्व टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ही उपाययोजना केली आहे. पिंडदान विधीचे साहित्य टाकण्यासाठी प्लास्टिक टॅंकची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विधी उरकल्यावर स्नान करण्यासाठी खास शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. लोखंडी कुंपणामुळे बाणगंगेचे पावित्र्य राखण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news