Mumbai Water Crisis : वांद्य्रात मंगळवारी पाणीबाणी

काही भागांचा पाणीपुरवठा 14 तास बंद राहणार
Mumbai water crisis
वांद्य्रात मंगळवारी पाणीबाणीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : पाली हिल जलाशयाच्या 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतील गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात येत असून, मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 या एकूण 14 तासांत हे काम पूर्ण होईपर्यंत वांद्रे पश्चिमेला पाणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. या दुरुस्ती कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 14 तास बंद राहणार आहे. तर, काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

एच पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

Mumbai water crisis
AIMIM Loses Nominated Seat BMC : एमआयएमने स्वीकृत नगरसेवकपद गमावले

या परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार

वांद्रे पश्चिमेकडील हिल मार्ग, पेरी मार्ग, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग, सेंट अँड्य्रूज मार्ग, सेंट पॉल मार्ग, कार्टर मार्ग, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी परिसर. खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, चुईम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टी, खार पश्चिमेचा काही भाग, हनुमान नगर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, कार्टर मार्ग, युनियन पार्क रस्ता क्रमांक 1 ते 4, पाली हिल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर, पाली पठार झोपडपट्टी, खारमधील 15 वा ते 20 वा रस्ता परिसर, चॅपल मार्ग, वेरोनिका मार्ग, डॉ. पीटर डायस मार्ग, सेंट जॉन बॅप्टिस्ट मार्ग, माउंट मेरी कॅथेड्रल, वांद्रे पश्चिम बाजूचे क्षेत्र रस्ता परिसर. वांद्रे पश्चिम के. सी. मार्ग, एल. के. मेहता मार्ग, बाजार रस्त्याचा काही भाग, ए. के. वैद्य मार्ग, झिगझॅग मार्ग, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग, पाली माला मार्ग.

Mumbai water crisis
BJP Gains Control of BMC : मुंबई महापालिका तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच

या विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा :-

हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी येथे मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news