Manual scavenging ban : बंदिस्त गटारांतील हातसफाई बंद

मुंबई महापालिकेकडून अत्याधुनिक ग्रॅब मशीन्सचा वापर सुरू
Manual scavenging ban
बंदिस्त गटारांतील हातसफाई बंदpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : बंदिस्त गटारांतील गाळ काढताना सफाई कामगारांच्या जीवाला निर्माण होणार धोका लक्षात घेत मुंबई महापालिकेने अत्याधुनिक ग्रॅब मशीन्स खरेदी केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर याद्वारे कामाचा शुभारंभ झाला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी ग्रॅब मशीनद्वारे बंदिस्त गटारांतील गाळ उपसण्यात येणार असून 24 मशीन खरेदी केल्या जाणार आहेत.

मुंबईत मोठ्या प्रमाणात बंदिस्त गटारे असून आतापर्यंत सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये उतरवून गाळाची सफाई करावी लागत होती. कामगारांच्या गुदमरून मृत्यू होण्याच्या अनेक घटना मुंबईसह देशभरात घडल्या आहेत. छोटे रोबोटही महापालिकेने विकत घेतले होते. मात्र म्हणावी तेवढी साफसफाई होत नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी मानवविरहित बंदिस्त गटारांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता यांत्रिक ग्रॅब मशीन्स दाखल झाले आहे. यामुळे बंदिस्त गटारांतील गाळ तातडीने उपसणे शक्य होणार आहे.

Manual scavenging ban
Matheran alternative road project : माथेरान पर्यायी मार्ग केव्हा होणार?

प्रत्येक विभाग कार्यालयासाठी एक मशीन

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयासाठी एक मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे त्या त्या विभागांमधील बंदिस्त गटारांची साफसफाई वेळेत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या 24 मशीनसाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

अशी होणार सफाई

या मशीन मॅनहोलद्वारे गटारात सोडण्यात येणार आहेत. नाले आणि मॅनहोलमध्ये खाली उतरवल्यानंतर गाळ, प्लास्टिक कचरा, दगड आणि अन्य कचरा बाहेर काढण्यासाठी मशीनला विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आली आहे.

Manual scavenging ban
Leopard death : भाईंदरमध्ये पकडलेल्या बिबट्याचा 44 दिवसांनी मृत्यू

सफाई वेगात होणार

नव्या अत्याधुनिक मशीनमुळे बंदिस्त गटारांतील गाळ जलद गतीने काढता येणार आहे. या मशीनची ऑपरेटिंग सिस्टम जमिनीवर असल्यामुळे एक ते दोन कर्मचारी या मशीनद्वारे शहर व उपनगरातील त्या त्या ठिकाणचा गाळ उपसू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news