
पुढारी ऑनलाईन डेस्क : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुजित कुमार असे आरोपीचे नाव असून तो पंजाबमधील लुधियाना येथील मूळ रहिवासी आहे. मात्र तो सध्या मुंबईतील घाटकोपर येथे राहत होता. या बाबतीत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत गँगस्टर लॉरेन्सच्या टोळीतील 15 संशयित आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली आहे. सुजित कुमारने आरोपी नितीनच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. बाबा सिद्दीकी यांची रेकी करणारा आरोपी नितीन होता.
सुत्राकडून मिळालेल्या वृत्तानुसार, मुंबई क्राइम ब्रँच टीम आणि लुधियाना काउंटर इंटेलिजन्सच्या इनपुटनंतर, CIA-2 टीमने शुक्रवारी, 25 ऑक्टोबर रोजी आरोपी सुजित कुमारला अटक केली. असे सांगितले जात आहे की, सुजित कुमार मुंडियांच्या राम नगर भागात सासरच्या घरी आले होते. सुजित हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी झाला होता. बाबा सिद्दिकीला हत्येचा सूत्रधार नितीन गौतन सप्रे याने तीन दिवसांपूर्वी केला असता. यावेळी मुंबईमध्ये तीन दिवस राहिलेल्या आरोपींची देखभाल केली. तसेच त्यांना किराणा सामानाचा पुरवठा केला. सुजितला पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी आरोपी भगवंत सिंगला नवी मुंबई परिसरातून पकडले. पोलिसांनी सांगितले की, भगवंत सिंह उदयपूरहून मुंबईला एका आरोपीसोबत शस्त्रे घेऊन गेला होता. तो सुरुवातीपासून शूटर्स आणि कट रचणाऱ्यांच्या संपर्कात होता. 19 ऑक्टोबर रोजी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी डोंबिवलीतून नितीन सप्रे, पनवेलमधून रामफुलचंद कनोजिया, संभाजी किशोर पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे आणि चेतन पारधी यांना अंबरनाथमधून अटक केली होती. हे सर्व लोक मुख्य सूत्रधार शुभम लोणकर आणि सूत्रधार मोहम्मद जीशान अख्तर यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही अद्याप फरार आहेत. न्यायालयाने सर्वांना 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.