मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे सर्वजण तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरिशकुमार निषाद अशी आरोपींची नावे आहेत. (Baba Siddique murder case )
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने चारही आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याने पोलिस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार चारही आरोपींच्या पोलिस कोठडीत 25 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Baba Siddique murder case )