B Pharm New Syllabus: बी. फार्म अभ्यासक्रमात आता एआय, मशीन लर्निंग; फार्मसी शिक्षणात मोठा बदल

एनईपीनुसार पीसीआयचे अभ्यासक्रमात मोठे बदल; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून देशभर अंमलबजावणी
B Pharm New Syllabus
B Pharm New SyllabusPudhari
Published on
Updated on

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सच्या युगात औषधनिर्माण शिक्षणालाही तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी)च्या अनुषंगाने भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) बी.फार्म (बॅचलर ऑफ फार्मसी) अभ्यासक्रमात व्यापक बदल करत तो अधिक उद्योगाभिमुख, संशोधनकेंद्री आणि तंत्रज्ञानस्नेही केला आहे. सुधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून देशातील सर्व मान्यताप्राप्त फार्मसी महाविद्यालयांमध्ये होणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील वेगाने होत असलेले तांत्रिक बदल, औषध उद्योगातील डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर आणि जागतिक स्तरावरील कौशल्यांची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ औषधनिर्मितीचे सैद्धांतिक ज्ञान न देता संशोधन, औषध उद्योग, रुग्णालये, डिजिटल हेल्थकेअर आणि नियामक संस्थांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

B Pharm New Syllabus
Civil Defence shortage: राज्यातील नागरी संरक्षण दलाची वस्तुस्थिती चिंताजनक?

सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्षापासूनच फार्मास्युटिकल सायन्ससाठी पायथन प्रोग्रामिंग, हेल्थकेअर सायकोलॉजी अँड कम्युनिकेशन स्किल्स, डेटा ॲनालिटिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स हे विषय शिकविले जाणार आहेत. तिसऱ्या सत्रात मशीन लर्निंगची ओळख करून दिली जाईल.

पाचव्या सत्रात इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम, सहाव्या सत्रात फार्मास्युटिकल सायन्समधील एआय, तर सातव्या सत्रात क्लिनिकल ॲप्लिकेशन्समधील एआय हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

B Pharm New Syllabus
Bribery Case: जवानांची वैध देयके मंजूर करण्यासाठी लाच

चार वर्षांचा अभ्यासक्रम आठ सत्रांचा

पदवीसाठी किमान १९३ क्रेडिट्स आवश्यक असतील. प्रवेशासाठी बारावीमध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र हे विषय आवश्यक असतील. प्रत्येक विषयात किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक असून प्रत्येक सत्रात किमान ९० शैक्षणिक कार्यदिवस असतील. शिक्षण व परीक्षा इंग्रजी माध्यमातून होणार असून, डी.फार्म पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेटरल एन्ट्रीची सुविधाही कायम ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news