BMC News : आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्या निश्चित

विकास नियोजन विभाग आयुक्तांनी ठेवला स्वतःकडे
MCGM portfolio allocation
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त पदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी आयुक्तांसह चार अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. यात आयुक्तांनी स्वतःकडे विकास नियोजन हे महत्त्वाचे खाते ठेवले असून महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

महापालिकेच्या आयुक्त पदी विराजमान झाल्यानंतर प्रत्येक आयुक्त अन्य सनदी अधिकाऱ्यांकडे असलेल्या जबाबदारी निश्चित करतो. त्यानुसार अश्विनी भिडे यांनीही जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून तसे परिपत्रक सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. भिडे आणि अन्य आयुक्तप्रमाणे विकास नियोजन खात्याची जबाबदारी आपल्याकडे ठेवली आहे.

MCGM portfolio allocation
Mira Bhayander Municipal Budget: मिरा-भाईंदरचा 4,461 कोटींचा अर्थसंकल्प; कर्ज व सरकारी निधीवर मोठा भर

विकास नियोजन हे खाते महापालिकेतील महत्त्वाचे खाते असून याच खात्याअंतर्गत येणाऱ्या इमारत प्रस्ताव विभागामार्फत नवीन इमारतींना परवानगी देण्यात येते. दक्षता (अभियांत्रिकी शाखा), चाचणी लेखा परिक्षा व दक्षता अधिकारी, दक्षता अधिकारी (विशेष कार्य), प्रमुख अधिकारी (चौकशी) ही जबाबदारी ही भिडे यांनी आपल्याकडे घेतली आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे पश्चिम उपनगराची जबाबदारी सोपवण्यात आली असून संचालक (नियोजन), बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खाते, इमारत परिरक्षण, मध्यवर्ती खरेदी खाते, घनकचरा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्याकडे मुंबई शहर विभागासह सामान्य प्रशासन विभाग, विधी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अतिक्रमण निर्मूलन, करनिर्धारण व संकलन खाते, मालमत्ता कर सुधारणाबाबतची अंमलबजावणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे गोरेगांव मुलुंड लिंक रोड प्रकल्प, पूल, पर्जन्य जलवाहिन्या, सिमेंट कॉक्रीट रस्ते व वाहतूक, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्प व अन्य जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे पूर्व उपनगरासह नगर अभियंता, उद्यान खाते, प्राणीसंग्रहालय, कोस्टल रोड, स्मार्ट शहर संबंधीत कामकाज, शिक्षण, आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा, ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली व अन्य जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

MCGM portfolio allocation
Pune Municipal Revenue Plan: पुणे महापालिकेचा 5 हजार कोटी उत्पन्नवाढीचा आराखडा; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

कोणाकडे कोणत्या जबाबदाऱ्या?

  • अश्विनी भिडे आयुक्त

    विकास नियोजन, निधीसंबंधीच्या विशेष तरतूदी, कोणत्याही अतिरिक्त महापालिका आयुक्तांना नेमून न दिलेले कोणतेही अन्य विषय व खाती, दक्षता.

  • डॉ. अश्विनी जोशी

    शहर , विधि खाते, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, मुद्रणालय, जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय संपर्क कक्ष, देवनार पशुवधगृह, शहरी द्रारिद्रय निर्मूलन, अतिक्रमण निर्मूलन, शासनाशी समन्वय.

  • अभिजीत बांगर

    प्रकल्प, प्रमुख लेखापाल, जल अभियंता, गोरेगांव मुलुंड लिंक रोड प्रकल्प, प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), प्रमुख अभियंता (रस्ते), सिमेंट कॉक्रीट रस्ते व वाहतूक, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्प.

  • डॉ. बिपिन शर्मा

    पश्चिम उपनगर, आरोग्य खाते, सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय शिक्षण, मध्यवर्ती खरेदी खात्याशी संबंधीत कामकाज, शिल्पग्राम, अंधेरी, संबंधीत कामकाज, क्षेपणभूमी संबंधित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खाते.

  • डॉ. अविनाश ढाकणे

    पूर्व उपनगर, नगर अभियंता, उद्यान खाते, प्राणीसंग्रहालय, व्यवसाय विकास खाते, स्मार्ट शहर संबंधीत कामकाज, गणेशोत्सव संबंधी बाबी, नाट्यगृहे, तरण तलाव, वाचनालय, क्रिडा संकुल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news