Ashish Shelar News: ‘गर्जना नव्हे, कोल्हेकुई मोर्चा’; आशिष शेलारांचा विरोधकांवर निशाणा

‘निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम योग्य, पराभवानंतर आरोप’; ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निवडणुकांचा शेलारांकडून दाखला
Ashish Shelar
Ashish ShelarPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य. मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आरोप करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. विरोधकांचा रविवारचा मोर्चा गर्जना नसून कोल्हेकुई मोर्चा होता, अशा शब्दांत भाजप नेते, मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ज्ञानेशकुमार निवडणूक आयुक्त झाल्यानंतर झालेल्या सहा निवडणुकांपैकी तीन ठिकाणी भाजप किंवा एनडीएला यश मिळाले, तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे बिगरभाजप पक्षांची सरकारे सत्तेवर आली.

Ashish Shelar
MVA Seat Sharing Dispute: मविआत जागावाटपाचा तिढा! काँग्रेसने तीन जागांवर परस्पर उमेदवार दिले; ठाकरे गटाचा ‘मैत्रीपूर्ण लढती’चा इशारा

पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्ये भाजपला यश मिळाले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप म्हणजे लबाडी आहे. निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्यापेक्षा जनतेचा कौल स्वीकारण्याची गरज आहे, असे शेलार यांनी सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news