Asha Bhosle: सूर हरपला! आशा भोसले यांच्या निधनाने मराठी संगीत विश्वातील 'मैत्रीचा आधार' हरपला

Asha Bhosle Passes Away |आशाताई शेवटपर्यंत सर्वांशी तितक्याच मैत्रीपूर्ण नात्याने वागत राहिल्या
Asha Bhosle: सूर हरपला! आशा भोसले यांच्या निधनाने मराठी संगीत विश्वातील 'मैत्रीचा आधार' हरपला
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर, मुंबई

आशा भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी भेटल्या नेहमीप्रमाणे काय ग कशी आहेस असं विचारलं त्या मला खरेच ओळखत होत्या का मला अजिबात माहिती नाही. सांगताही येणार नाही. मी पत्रकार आहे आणि अधून मधून त्यांना फोन करते. याची त्यांना चांगलीच कल्पना असावी आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी काय ग कशी आहेस विचारलं असावं मला.

अर्थातच त्या मला काय गं कशी असा विचारतात याचा नियमित अप्रूप वाटायचं. स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटायचं आणि लता मंगेशकर नसलेल्या जगात आशाताई आहेत आपल्या सांस्कृतिक कोंडाणामध्ये अजून जग बेसूर झालं नाहीये याची जाणीव जरा आधार देत असायची.

मी छान आहे तुम्ही कशा आहात? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, मंगेशकरांना छान उत्तम आयुष्यची काहीतरी गॉड गिफ्ट आहे. बघ मी छान आहे आणि मजा करते. मी जाईन आणि खरंच काही त्रास न होता जावं असंच वाटत.

त्यांचं ऐकून मी मनातचं नाही असं म्हटलं. काल अचानक आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्याचं कळलं आणि खरंच वाटायला लागलं की आशा ताईंना असंच निघून जायचे आहे का?

आशाताई कायम उत्साही... सतत चिरतरुण. माई मंगेशकर कशा होत्या, याबद्दल फार माहिती नाही. पण आशाताई मात्र मनात येईल ते करणार स्वतःच्या टर्म्सवर जगणार. त्याची किंमतही मोजणार आणि ते करताना रसिकांना एका सुरेल प्रवासावर घेऊन जाणार याची जणू एक हमीच मिळत असायची.

मंगेशकर कुटुंब तसंही भाग्यवान आणि ते मराठी भूमीत जन्मले त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूसही भाग्यवान. आशाबाईंना कायमच लतादीदींच्या छायेत जगावं लागलं का? प्रश्न पडायचा. तो प्रश्न एकदा अशाच कुठल्यातरी उडत्या भेटीत मी त्यांना विचारलं होता.

राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी मराठी कवितांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आशाताईंनी राज ठाकरेंशी सादलेला संवाद आजही स्मरणात आहे. राजनी बोलावलं असतं तर मी केव्हाही कुठेही गेली असती, असा नर्मविनोद त्यांनी केला होता.

आशाताई अशाच होत्या की काय असंही वाटायचं. अशा आशाताई गंभीर गाणी कशा म्हणायच्या, असाही प्रश्न एकदा गप्पांमध्ये विचारला होता. त्यावेळीही आशाताई हसल्या होत्या. आशाताई कॅबेरेपासून भजनापर्यंत अत्यंत सुंदर गायच्या. जगाला भुलवायच्या. मंगेशकरांना जे वरदान होतं त्यात आशाताई सर्वात मैत्रीपूर्ण वागायच्या.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केवळ काही दिवसांपूर्वी रेडिओ जॉकीचा एफ एम रेडीओचा कार्यक्रम घेतला. तेव्हा आशाताई आवर्जून हजर होत्या. तरुण पिढीशी त्याच भाषेत बोलायच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या साक्षीनं काही ओळी गुणगुणल्याही होत्या.

आशाताईंना भारतरत्न मिळायला हवं असं वाटायचं. मिळेल अशी कुठेतरी मनाला खात्रीही वाटायची एकाच कुटुंबातल्या दोन भगिनींना भारतरत्न मिळायला हवं असं मराठी माणूस म्हणून वाटतही असायचं. आशाताई कधीही कशातच अडकून पडल्या नाही. काहीतरी करत गेल्या आणि रसिकांना तृप्त करत गेल्या हेच त्यांचे थोरपण.

आशाताई आम्ही तुमच्या प्रति कायम कृतज्ञ राहू. आशाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद जीवनाला सूर देण्याचं काम तुम्ही आमच्यासाठी केलं. त्यात तुम्ही आमच्या झाल्यात. लतादीदी आमचं दैवत होत्या तुम्ही कुठेतरी आमच्यातल्याच होत्या मर्द मानव तुम्हाला श्रद्धांजली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news