Wanted Accused Arrested: १९ वर्षांपासून वॉण्टेड आरोपीस राजस्थानातून अटक

गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
Arms Act Accused Arrested
Arms Act Accused ArrestedPudhari
Published on
Updated on

मुंबई: १९ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या कालुसिंग देवीसिंग राजपूत या आरोपीस राजस्थानातून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आर्म्स ऍक्टच्या गुन्ह्यांत जामिन मिळताच कालूसिंग हा पळून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबई शहरात विक्री करणार्‍या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जानेवारी २००७ साली कालूसिंगला घातक शस्त्रांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी घातक शस्त्रे जप्त केली होती.

Arms Act Accused Arrested
Ghodbunder Road Condition: घोडबंदरकरांना रस्त्यावर उतरायला का भाग पाडताय? ठाणे महापालिकेची उच्‍च न्‍यायालयाकडून चांगलीच कानउघाडणी

याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याला किल्ला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध किल्ला न्यायालयाने जाहीरनामा काढला होता. या जाहीरनाम्यानंतर त्याचा गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता.

अलीकडेच तो राजस्थानात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नार्वेकर, पोलीस हवालदार तुपे, बैलकर आदी पथकाने कालूसिंगला प्रतापगडच्या बाराडिया परिसरातील राहत्या घरातून सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले.

Arms Act Accused Arrested
Swabhiman Nidhi Scheme: स्वाभिमान निधी योजनेसाठी उद्धव ठाकरे गटाचा आग्रह

चौकशीत तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news