Mumbai High Tide: पावसाळ्यात 24 वेळा मुंबईच्या समुद्रात महाकाय लाटा उसळणार! लाटांची उंची पावणेपाच मीटरपर्यंत

समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे पालिकेचे आवाहन
Mumbai High Tide
Mumbai High TidePudhari
Published on
Updated on

मुंबई: अरबी समुद्रात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 वेळा महाकाय लाटा उसळणार आहेत. या लाटांची उंची सुमारे साडेचार मीटर ते पावणे पाच मीटरपर्यंत असणार आहे. त्यामुळे या दिवशी मुंबईकरांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

पावसाळ्यात अरबी समुद्राला मोठी भरती असते. त्यामुळे समुद्रातील पाणी मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया व अन्य चौपाट्यांवर धडकते. त्यामुळे पावसाळ्यात समुद्र किनारी फेरफटका मारणे, धोकादायक असते.

Mumbai High Tide
Girgaon Water Crisis: पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! गिरगावकरांचा मुंबई महापालिकेवर तीव्र संताप

यासाठी मुंबई महापालिका वेळोवेळी सावधतेचा इशारा देते. यावेळी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात 24 वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. सर्वाधिक 4.89 उंचीच्या लाटा 16 जुलैला उसळणार आहेत.

Mumbai High Tide
BDD Chawl Redevelopment: नायगाव बीडीडीतील 537 घरांचे शुक्रवारपासून वितरण

भरतीच्या काळात मुंबईकरांनी जीव धोक्यात घालून समुद्रकिनारी फेरफटका मारू नये, अशी विनंती केली धोक्याचे फलकही लावण्यात येणार आहेत. जीव रक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Pudhari

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news