Antilia Case: अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहांच्या भूमिकेची चौकशी करा; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची याचिकेतून मागणी

सायबर तज्ज्ञाच्या जबाबाचा आधार
Param Bir Singh
Param Bir Singh (Source- PTI)
Published on
Updated on

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी नव्याने करण्यात आली आहे.

निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भीमराव ऊर्फ भीमराम घाडगे यांनी एनआयएच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Param Bir Singh
Girls Polytechnic Admission: ड्रेस डिझायनिंग सोडून मुलींची कॉम्प्युटर, ‘एआय’ला पसंती!

या याचिकेसाठी सायबर तज्ज्ञ ईशान देवेश सिन्हा यांनी २०२१ मध्ये एनआयएकडे दिलेल्या जबाबाचा आधार घेण्यात आला आहे. सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’ या टेलिग्राम वाहिनीबाबतची माहिती त्यांनी परमबीर सिंह यांना दिली होती. सिन्हा यांच्या जबाबानुसार, ९ मार्च २०२१ रोजी त्यांची परमबीर सिंह यांच्याशी भेट झाली.

Param Bir Singh
Private Coaching Classes: कोचिंग क्लासेसवरील कठोर अटी मागे घ्या! राज्यातील क्लासचालकांची मागणी

सिंह यांच्या सांगण्यावरून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित माहितीचा अहवाल तयार केला. आपण तयार केलेल्या मूळ अहवालात अँटिलियाची जबाबदारी स्वीकारणारे पोस्टर नव्हते; मात्र ते पोस्टर अहवालात समाविष्ट करण्यास सांगण्यात आले, असा दावा सिन्हा यांनी केला आहे. या कामासाठी आपल्याला पाच लाख रुपये मिळाल्याचेही सिन्हा यांनी जबाबात सांगितल्याचे याचिकेत नमूद आहे.

दरम्यान, अँटिलिया प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी दहा आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

परमबीर सिंहांची चौकशी झाली नाही

घाडगे यांनी याचिकेत म्हटले आहे की, सिन्हा यांचा जबाब एनआयएने नोंदविला असतानाही परमबीर सिंह यांच्या कथित भूमिकेची पुरेशी चौकशी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपास करून सिंह आणि सिन्हा यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news