पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांतच वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सत्ताधारी सरकारने राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये आता पाळणाघरे सुरू करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि.१०) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत शोक प्रस्ताव मांडला. यावेळी रतन टाटा यांना मरणाेत्तर भारतरत्न देण्याचा प्रस्ताव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आला.
समाजातील शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे स्थापण करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे सुरू करण्यात येतील, असे महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषणेपूर्वी आज (दि.१०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय, सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा, मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी वाढवण्यात येणार, शाळांना २० टक्के वाढीव अनुदान, मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ
पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला
बोरिवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी.
नाशिकरोड, तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय.
महाराष्ट्र साहित्य परिषदेला नाशिक रोडच्या देवळालीतील भूखंड.
जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता