Andheri BMC Waste Management: उघड्या नाल्यात कचरा टाकल्याप्रकरणी महानगरपालिकेची कंत्राटदाराला नोटीस

४८ तासांत प्रतिसाद न मिळाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा
BMC
BMC pudhari photo
Published on
Updated on

मुंबई: अंधेरी पश्चिमच्या के.पश्चिम वॉर्डमधील उघड्या नाल्यात सुका कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेने 'आकार मुंबई' या खासगी संस्थेविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेने संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ४८ तासांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास, संस्थेसोबतचे कंत्राट रद्द केले जाईल आणि वॉर्डमधील संस्थेद्वारे चालवली जाणारी सुका कचरा वर्गीकरण केंद्रे बंद केली जातील, असे निर्देश दिले. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

BMC
Mumbai FDA Action: मुंबईत अन्नभेसळीविरोधात एफडीएची धडक मोहीम; चार हॉटेलसह नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित

तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, 'आकार मुंबई'चे सुका कचरा गोळा करणारे वाहन लोखंडवाला बॅक रोडवरील रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या नाल्यात कचरा टाकत होते. तक्रारीसोबतच, कथित घटनेचा व्हिडिओ आणि वाहनाच्या व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीमचा अहवालही महापालिकेला देण्यात आला होता.

मुंबई शहर व उपनगरातील नाल्यांमधील कचरा ही महापालिका प्रशासनासाठी नेहमीच त्रासदायक गोष्ट ठरली आहे.

काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु

कंत्राटदार आणि संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल. हे प्रकरण महापालिका प्रशासनाने गंभीरपणे घेतले आहे. मुंबई के-वेस्ट वॉर्डमधील सुका कचरा संकलनासाठीचा टेम्पो मेसर्स अनुष्मान अँड कंपनीने पुरवला होता, तर तेथील सुका कचरा केंद्रे 'आकार मुंबई' ही संस्था चालवते.

BMC
Mumbai Beach Safety: मुंबईच्या ८ चौपाट्या ‘डेन्जर झोन’मध्येच! गिरगाव-जुहू वगळता कुठे आहे धोका?

पुढील कारवाईसाठी महापालिकेकडून दोघांनाही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

महापालिकेने स्पष्टीकरण मागविले

'आकार मुंबई'चे कार्यालय जोगेश्वरी पूर्व येथे असून, ही संस्था के-वेस्ट वॉर्डमध्ये तीन ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्रे चालवते. पालिकेने या कथित कृत्याला गंभीर उल्लंघन मानले असून, संस्थेकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

या कारवाईतून कचरा संकलन व विल्हेवाटीशी संबंधित नियमांच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी स्पष्टपणे दिसून येते. संस्थेच्या प्रतिसादानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news