

मुंबई : राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. परंतु, राज्याच्या सध्याच्या आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे. ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याचे समजते. रायगड जिल्ह्यात सुमारे चार लाख २३ हजार आनंदाचा चार लाख २३ हजार आनंदाचा शिधाचे लाभार्थी आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चनाडाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. परंतु, राज्याच्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधीच नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि पूरस्थितीने राज्यात प्रचंड मोठे नुकसान झाले असताना शेतकरी तसेच गरिबांची दिवाळी फराळाविनाच जाईल, असे चित्र असल्याचे म्हटले जात आहे. यंदा दिवाळीत आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली.
मागील काळात या लाभार्थीनी लाभ घेतला आहे. मात्र यावेळी जिल्ह्यात अनेकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे बाधितांनी आनंदाचा शिधा मिळाल्यास मोठा आधारा झाला होईल. अद्यापही शासनाकडून या योजनेबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.
एकनाथ शिदे यांच्या सरकारने उत्सवांच्या काळात आनंदाचा शिधा दिला होता. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देण्यात आलेला नाही. राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खर्च ३५ ते ४० हजार कोटी रुपये असून, हा निधी उभारताना इतर विभागांना मोठा फटका बसत आहे. दिवाळीत आनंदाचा शिधा यंदा शक्य नाही. त्यासाठी ३५० कोटी रुपये लागतात. अर्थखात्याने यावेळी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री