Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी कान्स फिल्म फेस्टिवलचा दौरा केला रद्द, पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतला निर्णय!

कान्स फिल्म फेस्टिवल रेड कार्पेटवर महाराष्ट्राची परंपरा असलेल्या पैठणीचे करणार होत्‍या प्रेझंटेशन
Amurta Fadnavis
Amurta Fadnavis
Published on
Updated on

AMRUTA FADNAVIS महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्‍नी अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत आपण कान्स चित्रपट महोत्‍वात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच काटकसर करण्याचे आवाहन केले होते. याचा मान राखत अनावश्यक विमानप्रवास टाळण्यासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्‍यांनी म्हटले आहे. तसेच या महोत्‍सवासाठी महाराष्ट्राची परंपरा असलेल्या पैठणीचे प्रेझेंटेशन करणार होत्‍या. याबाबात त्‍यांनी पैठणी तयार करणऱ्या सर्व कारागिरांचे आभार मानले आहेत पण राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या रविवारी जनतेला तसेच राजकीय नेत्‍यांना काटकसर करण्याचे आवाहन केले होते, पेट्रोलचा वापर कमी करा, अनावश्यक विमानप्रवास टाळा, सोने खरेदी करु नका असे आवाहन केले होते. देशाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्‍यांनी हे आवाहन केले होते. याची जाणीव ठेवून अमृता फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला आहे

सेलेब्रेटी करतात प्रतिनिधीत्‍व

फ्रान्स देशातील 'कान्स' (Cannes) या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य किनारी शहरात दरवर्षी मे महिन्यात आयोजित केला जातो. याठिकाणी जगभरातील सेलिब्रेटी हजेरी लावतात तसेच 'रेड कार्पेट'वरील फॅशन आणि कलाकारांचे ग्लॅमरस लुक्स जगभरात चर्चेचा विषय ठरतात. यावर्षी भारतातून आलिया भट्, उर्वशी रौतेला, कल्याणी प्रियदर्शन यांच्यासह अनेक सेलिब्रीटींनी या सोहळ्यात भाग घेतला आहे.

येवला येथील कलाकारांनी बनवली पैठणी

या विशेष प्रसंगासाठी येवला येथील कारागिरांनी महिनाभर अत्यंत मेहनतीने सुंदर 'पैठणी' साकारली होती. ही पैठणी व महाराष्ट्राच्या सांस्कतिक वारशाचे प्रतिनिधीत्‍व अमृता फडणवीस करणार होत्‍या

काय म्हणाल्या आहेत आपल्या पोस्टमध्ये

"महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या गौरवशाली हातमाग वारशाचे कान चित्रपट महोत्सवात प्रतिनिधित्व करण्याचे निमंत्रण मिळणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान होता. असे त्‍या म्हणाल्या आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय प्रवास मर्यादित ठेवण्याच्या आणि काटकसर अंगीकारण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करत, मी अत्यंत आदराने माझा 'कान्स' दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रवासासाठी घेतलेली मेहनत, कारागिरांचे कष्ट आणि कलात्मकता पाहता हा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु, जेव्हा देशाचा प्रश्न येतो, तेव्हा आपण नेहमीच प्रामाणिकपणे आणि दृढ विश्वासाने देशासोबत उभे राहिले पाहिजे. हे सुंदर स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या प्रत्येक कारागीर, डिझायनर आणि हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो. रेड कार्पेटची वाट पाहता येईल; पण देश नेहमी प्रथम आहे!" जय हिंद! जय महाराष्ट्र!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news