Amol Mitkari Post: मृतदेह पाचच सापडले.. सहावा व्यक्ती कुठं आहे? मिटकरींच्या पोस्टने महाराष्ट्रात खळबळ

टेक ऑफच्या डिजीटल नोंदणीवेळेच्या माहितीत विसंगती कशी आहे अशी शंका उपस्थित केली आहे.
Amol Mitkari Post:
Amol Mitkari Postpudhari photo
Published on
Updated on

Amol Mitkari Post Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अन् दिवंगत अजित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्या अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी अनेक गंभीर प्रश्न विचारून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.

Amol Mitkari Post:
NCP Merger | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार जयंत पाटलांना म्हणाले होते; 'जे झालं ते विसरून...'

अमोल मिटकरींचे खळबळजनक ट्वीट

अमोल मिटकरी यांनी सुरूवातीला सहा लोकांचा मृत्यू असं दाखवलं. मात्र नंतर फक्त ५ डेड बॉडी कशा काय मिळाल्या. सहावा व्यक्ती कुठं आहे. टेक ऑफच्या डिजीटल नोंदणीवेळेच्या माहितीत विसंगती कशी आहे अशी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी याबाबत आपण दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे देखील सखोल तपास करण्याची मागणी करणार आहे असे वक्तव्य केलं आहे.

Amol Mitkari Post:
Sanjay Raut |"घराणेशाहीवर चिखलफेक करणाऱ्यांना पापातून ..." : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत नेमकं काय म्‍हणाले?

डिजीटल नोंदणीत विसंगती कशी?

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी या ट्वीटनंतर पुढारी न्यूजशी देखील फोनवरून संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी, 'एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर विमानातील कागदपत्रे का जळाली नाहीत हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे.'

'त्याचबरोबर सुरूवातीला तुम्ही सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखवत होता. त्यानंतर फक्त ५ मृतदेहच कसे मिळाले. सहावी व्यक्ती कुठं आहे. टेक ऑफपूर्वी एवढे पायलट का बदलण्यात आले.' असे सावाल देखील मिटकरी यांनी केले आहेत.

त्यांनी, 'टेक ऑफच्या वेळी डिजीटल नोंदणी होते. त्यातील माहितीत इतकी विसंगती कशी आहे.' हा मुद्दा देखील उपस्थित केला.

Amol Mitkari Post:
Sunetra Pawar DCM | नागपूरच्या 'विजयगड'वर आता सुनेत्रा पवारांची पाटी; अजितदादांच्या आठवणींना उजाळा

अधिवेशनात मुद्दा मांडणार?

अमोल मिटकरी यांनी मला दादांची खुर्ची पाहून राहवलं नाही. मी स्वतः काही लोकं घेऊन केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांना दिल्लीत जाऊन भेटणार आहे. या प्रकरणाची गांभिऱ्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणार आहे.

महाराष्ट्राला सत्य समजलं पाहिजे. असं दादांचा एक कार्यकर्ता म्हणून मला वाटणं सहाजिक आहे. त्यामुळं मी ते ट्विट केलं आहे.

मिटकरी यांनी सुनेत्रा वहिनींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जड अंतःकरणानं हा शपथविधी सोहळा पार पाडला. मात्र अधिवेशानात मी हा मुद्दा मांडणार असल्याचं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news