

पुढारी ऑनलाईन डेस्क : "आई वरून शिव्या देणे ही आमच्या कोल्हापूरची पद्धत आहे" असे वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मातीची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी". अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत केली आहे. वाचा अमोल मिटकरी का म्हणाले ते. (Amol Mitkari)
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात एक विधान केले होते. या विधानावरून त्यांना गेले दोन दिवस संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. हा सत्कार कार्यक्रम चंद्रकांत पाटील पुण्याच्या पालकमंत्री पदावर निवड झाल्याने होता. यावेळी ते बोलत असताना म्हणाले होते," आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण मी मोदी आणि शहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही." त्यांच्या .या वक्त्यावरुन वेगवेगळ्या स्तरावरुन संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वादग्रस्त विधानावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत जाहीर माफी मागावी असं म्हंटल आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे, "आईवरून शिव्या देणे ही आमच्या कोल्हापूरची पद्धत आहे" असे वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मातीची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरकरांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी."