Noida housing project : नोएडातील अजनारा अँब्रोसिया गृहप्रकल्प फसवणूकप्रकरणी सीबीआयचे आरोपपत्र

बिल्डर कंपनी, संचालकांसह बँक अधिकाऱ्यांवर कटकारस्थानाचा आरोप
Noida housing project
Noida housing projectpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नोएडातील ‘अजनारा अँब्रोसिया’ गृहप्रकल्पातील घर खरेदीदारांच्या कथित फसवणूकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बिल्डर कंपनी, तिचे संचालक तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र नवी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू जिल्हा न्यायालयातील सीबीआय विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.

सीबीआयच्या तपासानुसार, बिल्डर कंपनी आणि संचालकांनी बँक अधिकाऱ्यांसह इतर खासगी व्यक्तींशी संगनमत करून घरखरेदीदार व गुंतवणूकदारांना कथित खोटी आश्वासने आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. त्याआधारे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बेकायदेशीर आणि फसव्या पद्धतींचा वापर केल्याचा आरोप आहे.

Noida housing project
BMC public toilets : सार्वजनिक शौचालयांत मुलांसाठी मूत्रपात्रे बंधनकारक!

या प्रकरणात बँकांकडून गृहप्रकल्पासाठी देण्यात आलेल्या कर्जवितरण प्रक्रियेचीही सीबीआयने चौकशी केली. उपलब्ध माहितीनुसार अजनारा अँब्रोसिया प्रकल्पाबाबत बँक अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता न घेतल्याचे आणि बिल्डरला आर्थिक फायदा करून दिल्याचे आरोप तपासात समोर आले आहेत. या प्रकरणाचा संबंध मोठ्या प्रमाणावर घरखरेदीदारांच्या फसवणुकीच्या प्रकरणांशी आहे.

Noida housing project
Mumbai garbage problem : संपूर्ण मुंबईत फक्त कचरा आणि घाणच!

घरखरेदीदारांना अद्याप ताबा मिळालेला नाही

घरखरेदीदारांची फसवणूक आणि बिल्डर-बँक संगनमताच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने एनसीआरमधील विविध गृहप्रकल्पांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी अजनारा अँब्रोसिया हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील अनेक घरखरेदीदारांना अद्याप ताबा मिळाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news