

Sanjay Raut on Ajit Pawar
मुंबई : "शरद पवार व अजित पवार जवळपास एकत्र आलेत वाटतायत. दोघांचेही उमेदवार एका चिन्हावर लढतायत. भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत अजित पवार हे तन मन धनाने त्यांच्याकडे असतील. अजित पवार यांच्यावर तिथं कारवाई होईल. त्यांना सरकारमधून बाहेर पडावे लागेल, दोन्ही दगडांवर पाय नाही ठेवत नाही. शरद पवार आमच्यासोबत आहेत, अजित पवारही महाविकास आघाडीत येतील," असे भाकित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दि. २४ माध्यमांशी बोलताना केले.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सध्याच्या राजकारणाबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या पैशांचा बाजार सुरू असून माणसाच्या मताला किंमत उरलेली नाही. "भाजपचे मांडलिक असलेले मुख्यमंत्री शिंदे स्वतःला बादशहा समजून गुलामांची बोली लावत आहेत. हे सर्व दिल्लीतील दोन बादशहांच्या इशाऱ्यावर सुरू आहे."
सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना (ठाकरे आणि शिंदे गट) एकत्र लढत असल्याच्या चर्चांवर राऊत यांनी पूर्णविराम दिला. "सोलापुरात दोन्ही शिवसेना एकत्र लढतायत हे अधिकृत नाही. उद्धव ठाकरे असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवली आहे," असे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी 'सगळं विसरायला हवं' असे जे विधान केले. ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत, ते सहज सोपे बोलले. संगळ विसरायला हवं हे त्यांचे विधान महत्त्वाचे आहे. "मेलेली मेंढरं आगीला भीत नाहीत. भुजबळांना क्लिनचिट मिळाली असेल, तर आता ईडीने प्रायश्चित्त घ्यायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावाला.
शिंदे गटाची अवस्था 'रुसलेल्या सुने'सारखी झाली आहे, जिला वारंवार दिल्लीत सासरच्या घरी (भाजपकडे) जावे लागते. भाजपचे धोरण 'माझे ते माझे आणि तुझे ते माझ्या बापाचे' असेच आहे, अशी बोचरी टीका करत रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे आता त्यांचा स्वतःचा पक्षही लक्ष देत नाही. त्यांनी पक्षाप्रती कृतज्ञ राहायला हवे होते, असा सल्लाही त्यांनी दिला.
डोंबिवली पालिकेतील (KDMC) पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचे फोटो 'यांना आपण पाहिले का?' अशा मथळ्याखाली भाजप आणि शिंदेंच्या कार्यालयाबाहेर लावणार असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.