Swapnil Kusale win Olympic medal
स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. Pudhari News Network

स्वप्नीलच्या कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा : अजित पवार

नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Swapnil Kusale win Olympic medal
नेमबाजीतील सुवर्णपदकाने स्वप्निलच्या पदांची हॅटट्रिक पूर्ण; कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव

स्वप्नीलच्या कामगिरीचा भारतासह महाराष्ट्रवासियांना अभिमान

कोल्हापूरच्या, महाराष्ट्राच्या मातीतल्या या सुपुत्राच्या कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, ऊर्जा मिळाली आहे. अतुलनीय कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला केला आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर राज्याला वैयक्तिक पदक मिळवून दिल्याचा माझ्यासह राज्यातील सर्व नागरिकांना आनंद झाला आहे. स्वप्नीलच्या कामगिरीचा भारतासह महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी स्वप्नीलची प्रशंसा केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news