Ajit pawar Sharad pawar: अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत? राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण
ajit pawar sharad pawar reunion maharashtra politics new equation
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेता अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात पक्षातील आमदारांशी चर्चा केल्याची माहिती पक्षातीलच एका नेत्याने दिली आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष वेगवेगळ्या पातळीवर चाचपणी करत आहेत. यामध्ये प्रमुख राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काका - पुतणे जवळ येण्याची चर्चा आहे. जर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होईल अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिली असल्याचे विश्वनिय सूत्रांनी दिली आहे.
स्वतंत्र लढल्यास दोन्ही गटांना फटका बसण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वतंत्रपणे लढल्यानं ग्राऊंडवरील कार्यकर्ता विभागल्यानं ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटाला फटका बसण्याची शक्यता आहे असे अजित पवार गटातील काही आमदारांनी व्यक्त केली आहेत. दरम्यान काही बड्या नेत्यांनी मात्र अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे.

