

Ajit Pawar Plane Crash CCTV Footage: अजित पवार यांच्या विमानाला अपघात कसा झाला याबाबत चर्चा सुरू असतानाच आता त्याबाबचे एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. यात अपघातानंतर आकाशात आगीचा मोठा भडका उडाल्याचे दिसते. यावरून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो.
आज सकाळी (दि. २८ जानेवारी) साधारणपणे १० वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचे वृत्त धडकले होते. त्यावेळी अपघात स्थळाचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित होत होते. यावेळी खासगी चार्टर विमान हे पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसत होतं.
मात्र विमानतळाच्या एवढ्या जवळ असतानाही हे विमान एवढं कसं जळालं याबाबत चर्चा सुरू होती. कालांतराने विमानतळाच्या जवळील एका सीसीटीव्हीमध्ये विमान अपघातावेळेची दृष्ये व्हायरल होत आहेत. यात ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी लगेचच आकाशात उंच उडालेला आगीचा भडका दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसते?
सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी अजित पवारांचे विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले. 8 वाजून 46 मिनिटांनी विमान क्रॅश झाले. क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी आगीचे लोट दिसून येत आहे. यावरुन विमानातील सर्व प्रवाशांची काय स्थिती झाली असेल, याचा अंदाज येतो.
वेळेत पोहोचणारा माणूस चुकीच्या वेळी गेला
प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारा माणूस चुकीच्या वेळी गेला आज.. नीतीच्या घड्याळाची वेळ चुकली, अशा भावना अजित पवारांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.
तीन दिवसांचा दुखवटा
महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.