

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा," अशी एक्स पोस्ट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.