

Ajit Pawar Sayaji Shinde:
अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोपनमधील वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे. कुंभ मेळ्यातील साधू ग्राम उभाण्यासाठी तपोवनमधील वृक्ष तोडण्याचा प्रशासनाचा मानस होता. त्याला नाशिककरांसह राज्यातील अनेक नामवंत लोकांनी विरोध केला. याबाबत सध्या आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेत. तपोवन इथं चिपको सारखं आदोलन केलं होतं. यानंतर अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात याकडं सर्वांच लक्ष होतं.
दरम्यन अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत सयाजी शिंदे यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. अजित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.'
सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन वृक्षतोडीला विरोध केला होता. त्यांनी “या जगात झाडं हीच खरी सेलेब्रिटी आहेत. सावली, हवा, फळं, फुलं, जीवन देणारे झाडं आहेत. मी इथे स्टार म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून आलो आहे. कारण झाडं वाचली तरच नाशिक वाचेल.” असं वक्तव्य केलं होतं.
सयाजी शिंदेंची सह्याद्री देवराई संस्था देखील तपोवन वृक्षतोडी विरोधी आंदोलनात सहभागी झालं आहे. सयाजी शिंदे यांनी सरकारनेच सर्वाधिक वडांची झाडे तोडली असून हे देशाचं दुर्दैव असल्याचं म्हटलं होतं. तुम्ही वडावर फुली मारली तर आम्ही शांत बसणार नाही असे वक्तव्य केले होते.