Ajay Devgn Vs Tukaram Mundhe: तुकाराम मुंडेंनी दणका देताच अजय देवगणची उच्च न्यायालयात धाव; 'जुबां केसरी' प्रकरण भोवणार?

जरी अजय देवगण उच्च न्यायालयात गेला असला तरी कारवाई काही थांबणार नाही
Ajay Devgn Vs Tukaram Mundhe
Ajay Devgn Vs Tukaram Mundhepudhari
Published on: 
Updated on: 

Ajay Devgn Vs Tukaram Mundhe: महाराष्ट्र राज्य एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सांगितलं की अजय देवगण हा त्याला बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात उच्च न्यायालयात गेला आहे. त्याला विमल इलायची ब्रँडची सरोगेट पान मसाला जाहिरातीवरून नोटीस बजावण्यात आली आहे.

एफडीएने अजय देवगण, शाहरूख खान आणि टायगर श्रॉफ यांना महिन्याभरापूर्वी ही नोटीस दिली होती. त्यानंतर आता तुकाराम मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यावेळी ही नोटीस बजावण्यात आली त्यावेळी हा ब्रँड आणि अभिनेत्यांना ही जाहिरात सर्व माध्यम प्लॅटफॉर्मवरून हटवण्यास सांगितलं होतं अन् त्याचे स्पष्टीकरण देखील देण्यास सांगितलं होतं.

Ajay Devgn Vs Tukaram Mundhe
Ajay Devgn BMC Action: चुकीला माफी नाही... सिंघम फेम अजय देवगणच्याही अनधिकृत बांधकामावर BMC चा हातोडा

आमची कारवाई सुरूच राहणार

त्यानंतर या कलाकारांनी जाहीररित्या कारणे दाखवा नोटिशीबाबत कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान माध्यमांशी बोलताा मुंडे म्हणाले, 'असिस्टंट कमिशनर यांनी याबाबत सुनावणी पूर्ण केली आहे. त्या आता पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जॉईंट कमिश्नरकडे पुढच्या आठवड्यात केस ठेवणार आहेत.'

मुंडे यांनी जरी देवगण हे उच्च न्यायालयात गेले असले तरी जोपर्यंत कोर्टाकडून कोणता आदेश येत नाही तोपर्यंत आमची कायदेशीर कारवाई नियमाप्रमाणे सुरू राहणार आहे.

Ajay Devgn Vs Tukaram Mundhe
Tukaram Mundhe | दिवाळीत ग्राहकांच्या हितासाठी तुकाराम मुंढे मैदानात : प्रत्‍येक खाद्यपदार्थाच्या पॅकिंगवर Expiry date घालावी लागणार!

कराराची सर्व कागदपत्रे सादर करा

अभिनेत्यांना त्यांनी कंपनीसोबत या जाहिरातीसाठी केलेला करार, वितरण चॅनल्स आणि विमल इलायची हे एक स्वतंत्र उत्पादन जे विक्रीला उपलब्ध आहे याबाबतच्या सर्व डिटेल्स सादर करण्यास सांगितलं आहे. विमल पान मसाला हे स्मोकलेस तंबाकू उत्पादन असून त्याचे राज्यात उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या सर्वांवर बंदी आहे.

Ajay Devgn Vs Tukaram Mundhe
Tukaram Mundhe | न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकले तुकाराम मुंढे

तोंडाच्या कॅन्सरमध्ये भारत अव्वल

भारतात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण अत्यंत जास्त असून तोंडाच्या कॅन्सरच्या जगातील एकूण केसेस पैकी ३० टक्के केसेस या भारतातील आहेत. हे प्रमाण जास्त असून त्याला स्मोकलेस तंबाकूचे सेवन करण्याची सवय देखील कारणीभूत आहे. राष्ट्रीय डेटा रजिस्ट्रीनुसार वर्षाला १ लाख ४३ हजार नवीन केसेस रजिस्टर होत आहेत. त्यातील जवळपास ८० हाजर जाणांचे मृत्यू होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.