AI crime : एआय क्राईम’चा वाढता धोका

गुन्हेगारांच्या हातात नवे डिजिटल शस्त्र
AI crime
AI crimepudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महेश पांचाळ

तंत्रज्ञान जितक्या वेगाने विकसित होत आहे, तितक्याच वेगाने गुन्हेगारीच्या पद्धतीही बदलत आहेत. त्यामुळे भविष्यात सायबर गुन्ह्यांबरोबरच ‘एआय क्राईम’विरोधातील लढाईही पोलिसांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. गुन्हेगारांच्या हातातील हे नवे डिजिटल शस्त्र रोखण्यासाठी तंत्रज्ञान, डिजिटल फॉरेन्सिक आणि जनजागृती या तिन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे.

‘एआय’चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आता गुन्हेगारीतही एआयचा वापर होऊ लागला आहे. आवाजाची हुबेहूब नक्कल करणे, बनावट फोटो-व्हिडीओ तयार करणे, खोटा व्हिडीओ कॉल करणे आणि नागरिकांना विश्वासात घेऊन पैसे उकळणे, असे प्रकार एआयच्या मदतीने केले जात आहेत. त्यामुळे ‘एआय क्राईम’ हे सायबर पोलिसांसमोरील नवे आव्हान ठरत आहे.

AI crime
Bronchoscopy treatment : तीन महिन्यांपासून तरुणाच्या फुप्फुसात अडकलेली ‘चिकूची बी’ काढण्यात यश

बनावट व्हिडीओ कॉलचा धोका

एआयच्या मदतीने चेहरा आणि आवाज बदलून बनावट व्हिडीओ कॉल तयार करता येतो. पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी किंवा कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावले जाऊ शकते. विशेषतः ‘डिजिटल अरेस्ट’च्या फसवणुकीत अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावरील माहितीचा गैरवापर

नागरिक सोशल मीडियावर आपले फोटो, कुटुंबाची माहिती, नोकरी, मित्र आणि प्रवासाबाबतची माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करतात. हीच माहिती गुन्हेगारांसाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घेणे.

ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात फोन

एआयच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करणे आता सोपे झाले आहे. गुन्हेगार एखाद्या व्यक्तीचा आवाज तयार करून त्याच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना फोन करू शकतात. ‘माझी अडचण झाली आहे’, ‘तातडीने पैसे पाठव’ किंवा ‘अपघात झाला आहे’ असे सांगून पैसे मागितले जाऊ शकतात.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात फोन आला तरी पैशांची मागणी असल्यास खात्री करावी.

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

  • ओटीपी, पासवर्ड आणि बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये.

  • व्हिडीओ कॉलवर समोरची व्यक्ती दिसत असली तरी तिची स्वतंत्रपणे पडताळणी करावी.

  • सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती आणि फोटो अनावश्यकपणे सार्वजनिक करू नयेत.

AI crime
NEET UG admission : तीन खासगी विद्यापीठांतील ४० टक्के कोट्याने विद्यार्थी संभ्रमात

डीपफेकमुळे बदनामी

एआयच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्हिडीओमध्ये बसवता येतो. याला ‘डीपफेक’ म्हणतात. संबंधित व्यक्तीने प्रत्यक्षात काहीही केलेले नसतानाही त्याने काहीतरी केले किंवा बोलले असल्याचा बनावट व्हिडीओ तयार केला जाऊ शकतो.

पोलिसांसमोर नवे आव्हान

एआयचा गैरवापर वाढल्याने पोलिसांसमोरही नवे आव्हान उभे राहिले आहे. एखादा फोटो, व्हिडीओ किंवा ऑडिओ खरा आहे की एआयच्या मदतीने तयार केला आहे, हे तपासणे आवश्यक ठरते. यासाठी डिजिटल फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासाची मदत घ्यावी लागते.त्याचवेळी एआयचा वापर गुन्हेगार शोधण्यासाठीही केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news