Agniveer Scheme Controversy: शहीद अग्निवीराच्या आईची हायकोर्टात धाव

ऑपरेशन सिंदूरनंतर जवानाला पूर्ण लाभ नाकारला; केंद्र सरकारला नोटीस
Agniveer Scheme Controversy
Agniveer Scheme ControversyPudhari
Published on
Updated on

मुंबई: जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान धारातिर्थीवर पडलेल्या शाहीद जवानांच्या कुटुंबीयांना पूर्ण लाभ नाकारल्याने शहीद अग्निवीराच्या आईने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. नियमित सैनिकांप्रमाणेच लाभ देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावत 7 मेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.तसेच याचिकेची सुनावणी 18 जूनला निश्चित केली.

गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेलेे. या हल्ल्यात 9 मे रोजी पूंछ येथे मुरली नाईक शहीद झाले.

Agniveer Scheme Controversy
Digital Land Records: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बीपीएमएस प्रणालीत नवीन सुविधा; एका क्लिकवर भरणा, थेट 7/12 वर नोंद

त्यांच्या मृत्यूनंतरदेखील त्यांना नियमित सैनिकां प्रमाणे लाभ देण्यात न आल्याने मुरली यांच्या मातोश्री ज्योतिबाई नाईक यांनी हायकोर्टात ॲड. संदेश मोरे, ॲड. हेमंत घाडीगावकर व ॲड. हितेंद्र गांधी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

Agniveer Scheme Controversy
Maharashtra Economy Growth: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूरलाही मागे टाकेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या याचिकेवर मंगळवारी

न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाला नोटीस बजावून अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका मांडण्याचे आदेश देत न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर सुनावणी 18 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news