Matrimonial Fraud: मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांची फसवणूक; ‘आदर्श म्हात्रे’च्या जाळ्यात तब्बल ७८ महिला?

वैज्ञानिक, पोलीस अधिकारी असल्याची खोटी ओळख; राज्यभरात १५ हून अधिक गुन्हे, चौकशीत धक्कादायक खुलासे
Matrimonial Fraud
Matrimonial FraudPudhari
Published on
Updated on

कोपरखैरणे : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळाच्या आधारे अनेक महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या आदर्श म्हात्रे याचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. 26 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली असली, तरी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत असून आतापर्यंत त्याच्याविरोधात राज्यभरातून 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. चौकशीदरम्यान त्याच्या जाळ्यात 78 महिला अडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून समाजातील बदनामीच्या भीतीने त्या समोर येत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.

Matrimonial Fraud
Ullas Nav Bharat Literacy Programme: 1 लाख आजी-आजोबांची परीक्षा; ‘उल्लास’ साक्षरता चाचणीत आजी-आजोबांची शाळेकडे धाव

विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर स्वतःचे प्रोफाइल अपलोड करून त्याद्वारे लग्नाचे आमिष दाखवून तो महिलांकडून पैसे उकळत होता. या यादीत तिशीच्या पुढील महिला, गर्भश्रीमंत महिला, उच्चशिक्षित, अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अशा महिलांचा समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

केवळ 10 वी पास असलेल्या आदर्शने विवाह जुळवणाऱ्या विविध संकेतस्थळांवर स्वप्नील वारुळे, नहुष म्हात्रे, जयेश नाईक, तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोवेकर, हेमंत गायकर, रुद्रेश गोधळी, जयेश सोनवणे, आदित्य म्हात्रे, हेमंत गोंधळी, जय पाटील या नावांनी प्रोफाइल अपलोड केलेले असून यात तो शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, श्रीमंत असल्याची थाप मारत होता.

Matrimonial Fraud
Zaveri Bazaar Gold Fraud: अठरा कोटींचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिराचे पलायन; वर्कशॉप बंद करून फरार

महिलांना भेटण्यासाठी जाताना बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यांसारख्या महागड्या गाड्या तो घेऊन जात होता. त्याच्याविरोधात आतापर्यंत नागपूर, यवतमाळ, पुणे आणि नवी मुंबईत 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर आपण विवाह जुळवत असाल, तर प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्यावी. आदर्श म्हात्रे याने स्वतः शास्त्रज्ञ, पीडब्ल्यूडीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याची थाप मारत ओळखपत्र जोडले होते. त्याची खात्री उच्चशिक्षित असणाऱ्या एकाही महिलेने केली नाही, परिणामी फसवणूक झाली. यासाठी प्रत्येक कागदपत्र तपासून खात्री करून घ्यावी, असे आवाहन तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

Matrimonial Fraud
Mumbai Rain: मुंबईत उकाड्यानंतर दिलासा; 31 मार्चपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

गुन्ह्याची पद्धत :

आदर्श हा विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर प्रोफाइल अपलोड करत होता. त्याद्वारे एखादी महिला जाळ्यात अडकली, कि तिला आलिशान हॉटेलमध्ये घेऊन जात होता. अचानक एखाद्या दिवशी कुठले तरी गंभीर कारण सांगून 15/20 लाखांची मागणी करत होता. त्या महिलेने पैसे दिले कि संपर्क हळूहळू कमी करत होता. एखाद्या महिलेने फारच तगादा लावला, तर दुसऱ्या महिलेकडून पैसे घेऊन त्यातील थोडेफार पैसे पहिलीला देत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news