अभिनेता गोविंदा पायाला गोळी लागून जखमी, रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

Govinda : गोविंदा त्याच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागून जखमी
Govinda
गोविंदा यांच्या पायावर आज सकाळी चुकून त्यांच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागली. (File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेता आणि शिंदे गटाचे शिवसेना नेते गोविंदा (Actor Govinda) यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा यांच्या पायावर आज सकाळी चुकून त्यांच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागली. यामुळे ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Actor Govinda Suffers Bullet Injury : नेमकं काय घडलं?

गोविंदा आज पहाटे कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होते. या दरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागण्याची घटना घडली. त्यांच्या निवासस्थानी हा प्रकार घडला. त्यांच्या पायातून गोळी काढण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची पुष्टी गोविंदा यांच्या व्यवस्थापकाने केली आहे. “कोलकाता येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी सकाळी ६ वाजण्याची विमानाची वेळ होती. आपण विमानतळावर पोहोचलो होतो. ही घटना घडली तेव्हा गोविंदा त्यांचे निवासस्थान सोडून विमानतळाकडे निघाले होते,” असे गोविंदा यांचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी सांगितले.

रिव्हॉल्व्हर हातातून पडले अन्न्‌  एक गोळी सुटली...

"गोविंदा यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर असून ते त्यांच्या हातातून पडले आणि यादरम्यान त्यातून एक गोळी सुटली आणि ती गोविंदा यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता त्याची प्रकृती ठीक आहे. ते सध्या रुग्णालयात आहेत," असेही ते पुढे म्हणाले.

गोविंदा यांची प्रकृती ठीक

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी गोविंदा यांची प्रकृती ठीक असून त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची पुष्टी केली आहे. पण, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Govinda
Rajinikanth | अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news