भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबवा : मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबवा : मंत्री संजय राठोड यांचे निर्देश
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: सध्या दिवाळी सण जवळ आला असून, अन्नपदार्थ, मिठाई, विविध मसाले, तेल, तूप यासह अनेक खाद्यपदार्थ खरेदीसाठी नागरिकांची दुकानात गर्दी होत असते.  अनेक नागरिकांकडून या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीही येत असतात. या तक्रारींची दखल घेत अशा उत्पादक, वितरण व विक्रेते यांची सखोल तपासणी करण्यासह संशयास्पद आणि तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या अन्न पदार्थ आणि औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्याबाबत धडक मोहीम राबवावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नागरिकांची अन्नपदार्थ, मिठाई, चॉकलेटस, तेल, तूप यासह विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. त्याचवेळी या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्याने त्याची थेट दखल मंत्री राठोड यांनी घेतली आहे. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला अशा उत्पादक, वितरण व विक्रेते आदींवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 मधील कलम 9 d (a) व त्याखालील शासनाने केलेले नियम, अधिसूचना यांच्यामधील तरतूदी पाहता राज्यामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधने ही नामांकित ब्रँडची नक्कल करुन बाजारात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. यामध्ये सौंदर्य प्रसाधनामधील रंग, लेबलिंग, चुकीचे दावे, तसेच कलम 9 d (a) व (b) मधील तरतुदीनुसार दुसऱ्या सौंदर्य प्रसाधनाची नक्कल करणे, अशा पद्धतीने केलेले पॅकेजिंग व लेबलिंग करणे, अस्तित्वात नसलेल्या कंपनीचे नाव टाकणे यासारखे प्रकार घडत आहेत. असे प्रकार हे गंभीर स्वरुपाचे असून त्याबाबत विभागाने धडक मोहीम राबवावी, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

दिवाळीत उपयोगात आणले जाणाऱ्या या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मुंबईमध्ये मनिष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, अल्फा व्हिलेज विलेपार्ले, तर ठाणे मधील उल्हासनगर इत्यादी ठिकाणी तक्रारदार अशा दुकानदार आणि विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याबाबत अधिक आग्रही आहेत. त्यामुळे औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरण व विक्रेते यांची सखोल तपासणी करण्यासह संशयास्पद/ आणि तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या अन्न पदार्थ आणि औषधांचे नमुने घेऊन धडक मोहिम राबवावी, अशा सूचना त्यांनी विभागाच्या आयुक्तांना दिल्या आहेत. तथापि, अशी कार्यवाही करताना कायद्याचे पालन करणाऱ्या वितरक आणि विक्रेते यांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजीही घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news