मीरारोड पोलीस ठाणे
डॉ. मोहम्मद आसिफ खान (३०)pudhari news network

Thane Love Jihad News | मीरारोडमध्ये लव्ह जिहादचा प्रकार

Love Jihad | लग्नाचे अमिष दाखवून फसवणाऱ्या डॉक्टरला अटक
Published on

भाईंदर : गेली दिड वर्षे लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्या डॉ. मोहम्मद आसिफ खान (३०) विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला गुजरातच्या वापीमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

३४ वर्षीय पीडित तरुणी मीरारोड येथील फॅमिली केअर खासगी रुग्णालयात नोकरीला होती. एका महिला डॉक्टरच्या माध्यमातून तिची ओळख डॉ. मोहम्मद आसिफ खानशी झाली. ओळख वाढवत आरोपी जानेवारी २०२३ पासून सतत पिडीतेच्या घरी येत होता. १८ फेब्रुवारी २०२३ पासून त्याने प्रेमसंबंध निर्माण केले. पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून तो शरीरसंबंध ठेवत राहिला. पिडीतेकडून विरोध होत असतानाही तो जबदरस्ती करत असे. यातून ती तीन वेळा गर्भवती राहिली. आरोपी डॉक्टरने ओळखीच्या डॉक्टरांकडून गर्भपाताच्या गोळ्या मिळवून त्या पिडीतेला खाऊ घातल्या. हे सत्र असेच सुरू राहिले. एकदा तर त्याने त्याची आई रजिया खान सोबत पिडीतेचे बोलणे करून दिले, रजिया यांनी आरोपीच्या वडीलांना लग्नासाठी तयार करू असे आश्वासन पिडीतेला दिले. इकडे हा डॉक्टर प्रेमाचे नाटक करत संबंध ठेवत राहिला.

तिसऱ्यावेळी आरोपीने पिडीतेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानंतर तो ४ दिवसांनी गुजरातमधील वापीला निघून गेला. पिडीतेने त्याला अनेकदा त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो कॉल घेण्याचे टाळून लग्नास नकार देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने मीरारोड पोलीस ठाणे गाठले. न्यायालयाने या डॉक्टरला २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news