मुंबई : टूरच्या नावाखाली वृद्धेला गंडा; वयोवृद्ध महिलेची फसवणूक करणार्‍या आरोपीस अटक

मुंबई : टूरच्या नावाखाली वृद्धेला गंडा; वयोवृद्ध महिलेची फसवणूक करणार्‍या आरोपीस अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी वृद्धेकडून घेतलेल्या सुमारे आठ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तेजस महेंद्र शाह या टुर्स मालकाला दहिसर पोलिसांनी अटक केली. नंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

संबंधित बातम्या 

तक्रारदार महिला कुटुंबियांसोबत बोरिवली येथे राहते. खासगी बँकेतून निवृत्त झालेल्या या महिलेला पतीसोबत विदेशात फिरायला जायचे होते. याचदरम्यान तिने गुजराती वर्तमानपत्रात पूर्वा हॉलिडेज कंपनीची जाहिरात पाहिली. या कंपनीने न्यूझीलंडसाठी आकर्षक टूर पॅकेजचे आश्वासन दिले होते. यानंतर तिने कंपनीच्या कार्यालयात जाऊन चर्चा करुन शाह यांना तिच्यासह पतीसाठी न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी 8 लाख 33 हजार रुपये जमा केले. काही दिवसांनी त्यांचा व्हिसा आला. मात्र कंपनीने त्यांच्या न्यूझीलंडचे तिकिट काढले नव्हते. वारंवार विचारणा करूनही शाहने त्यांना रिटर्न तिकिट पाठवले नाही.

ही महिला सतत पाठपुरावा करीत होती. यानंतर अखेर तेजसने 1 जानेवारी 2024 पर्यंत तिकिट बुक न झाल्यास त्यांचे संपूर्ण पेमेंट परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिकिट बुक केले नाही. त्यामुळे तिने शाहकडे पैसे परत मागितले. यानंतर त्याने 6 जानेवारीला त्यांना आठ लाख तीन हजार रुपयांचा चेक दिला. मात्र हा चेक दोन वेळा बँकेत डिपॉझिट केल्यावरही बाऊन्स झाला. त्यानंतर त्याने त्यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये ट्रान्स्फर केले.

मात्र उर्वरित 6 लाख 83 हजार रुपये तो परत करीत नसल्याने महिलेने दहिसर पोलिसांकडे जात तेजसविरुद्ध तक्रार केली. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन दिवसांपर्वूी त्याला अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news