Maharashtra Politics
Maharashtra Politics file photo

Maharashtra Politics | शिंदे-अजित पवारांमध्ये मध्यरात्री 'वर्षा'वर खलबते

दोन्ही पक्षातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न
Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. राष्ट्रवादीचे सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली.

गणपती दर्शनाच्या निमित्ताने ही बैठक झाली असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला दुरावा पाहता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सामील झाल्याचे शिवसेनेला रुचलेले नाही.

दोघात तिसरा भिडू आल्याने सत्तेत आणखी एक भागीदार वाढल्याने शिवसेना नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधात टिका करत असतात दोन्ही पक्षातील हा दुरावा

महायुतीला परवडणारा नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांना एकमेकांशी समन्वय वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनाने आखलेल्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीबाबत रखाकता आहे

देवेंद्र फडणवीस अनुपस्थित

या चर्चेवेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. ते मुंबईत असतानाही या चर्चेत सहभागी नव्हते. मात्र, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गणपती दर्शनाच्या निमित्त वर्षावर भेट दिली. त्यामुळे तेथे फडणवीस यांची उपस्थिती अपेक्षित नव्हती, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

Maharashtra Politics
Positive Thinking Day : आनंदी आणि निरोगी जगण्‍याचा 'मंत्र' सांगणारा दिवस
Maharashtra Politics
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, १३ सप्‍टेंबर २०२४

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news