आता रश्मी ठाकरेंवर वादग्रस्त टिप्पणी; भाजप नेत्याला मुंबई पोलीसांकडून नोटीस | पुढारी

आता रश्मी ठाकरेंवर वादग्रस्त टिप्पणी; भाजप नेत्याला मुंबई पोलीसांकडून नोटीस

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यांना मुंबई पोलीसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली आहे.

गजरिया यांनी रश्मी ठाकरेंवर आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार आली होती. गजरिया यांनी ट्विट करताना मर्यादा सोडताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे ट्विट केले. या ट्विटवरुन तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून जबाब देण्यास सांगितले आहे.

या ट्विटनंतर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारमधील पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. दरम्यान, गजरिया यांनी यापूर्वी अजित पवार यांच्यावरही आक्षेपार्ह ट्विट केल्याचे समोर आले आहे.

Back to top button