अधिवेशनासाठी आलेल्या भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण | पुढारी

अधिवेशनासाठी आलेल्या भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

मुंबई, पुढारी ऑनलाईन : हिंगणा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघे हे हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मुंबईत गेले असून गेले दोन दिवस ते अधिवेशनातही सहभागी झाले होते. अधिवेशनासाठी सभागृहात जाताना सर्व आमदारांची आणि अधिकाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.

आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व आमदारांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मेघे यांची तब्येत बरी असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button