मुंबई महापालिका निवडणूक : ‘वंचित’ची आरजेडी, मुस्लीम लीगसोबत आघाडी | पुढारी

मुंबई महापालिका निवडणूक : 'वंचित'ची आरजेडी, मुस्लीम लीगसोबत आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क :

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आरजेडी आणि मुस्लीम लीगसोबत आघाडी केल्याची माहिती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि. 13) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

यावेळी आंबेडकर म्हणाले, वंचित, आरजेडी आणि मुस्लिम लीग एकत्र आल्यानंतर तिन्ही पक्षांना जागावाटप कशा पद्धतीने केले जाणार हे जानेवारीच्या १५ तारखेपर्यंत जाहीर कले जाणार आहे. त्याचबरोबर मंगळवार ( दि. 14 )  पासून मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारालाही सुरवात केली जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

कोरोना अथवा इतर कारणे पुढे देवून या निवडणुका पुढे ढकल्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार भारतीय राज्‍यघटनेत नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा ?

Back to top button