विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधान परिषदेचे ११ आमदार २७ जुलैरोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागासाठी १२ जुलै रोजी मतदान  होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज (दि.१८) जाहीर केला आहे.

या निवडणुकीची अधिसुचना २५ जून रोजी काढण्यात येणार आहे. २ जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ३ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ५ जुलै उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. तर १२ जुलै रोजी मतदान आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

'हे' आमदार होणार निवृत्त

मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुलाखान दुराणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील हे विधान परिषदेचे आमदार २७ जुलैरोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी १२ जुलैरोजी निवडणूक होणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news