अरबी समुद्रात २३ ते २५ जून उसळणार महाकाय लाटा

अरबी समुद्रात २३ ते २५ जून उसळणार महाकाय लाटा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या पावसाळ्यात अरबी समुद्रात येणाऱ्या उधाणाच्या तारखा जाहीर केल्या असून, या दिवशी समुद्रात उसळणाऱ्या लाटांची अंदाजित उंचीही जाहीर केली आहे. मुंबईत अद्यापपर्यंत पाऊस दाखल न झाल्यामुळे ५ ते ८ जून या पाच दिवसांत अरबी समुद्रात उसळलेल्या महाकाय लाटांचा मुंबईवर तितकासा परिणाम झाला नाही. मात्र, २३ ते २५ जून या तीन दिवशी समुद्रात मोठी भरती आहे. या काळात मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जूनमधील हे तीन दिवस धोक्याचे असून, या दिवशी चौपाटीवर न जाण्याचा सल्ला पालिकेने मुंबईकरांसह पर्यटकांना दिला आहे. मोसमी पाऊस मुंबईच्या वेशीपाशी येऊन ठेपला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तो मुंबईत सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्यात शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यास व त्याचवेळी समुद्राला मोठी भरती असेल, तर शहरातील पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होण्याची भीती असते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news