महाविकास आघाडी ठरली महायुतीवर भारी; पहा महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी

महाविकास आघाडी ठरली महायुतीवर भारी; पहा महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी

मुंबईः प्रमोद चंचूवार : राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुती विरूध्द महाविकास आघाडी या राजकीय सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर महाविकास आघाडीच महायुतीवर भारी ठरली आहे. राज्यात १३ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल ०९ जागा भाजप आणि शिवसेना (ठाकरे) गटाने जिंकल्या आहेत. शिवसेना फुटल्यानंतरही उध्दव ठाकरेंनी भाजप एवढ्याच जागांवर विजय मिळवित आपली ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना (शिंदे) गटाने प्रत्येकी सात जागा जिंकल्या आहेत.

राज्यातील ४८ जागांपैकी ३० जागा जिंकून महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला तर महायुतीला १८ जागा मिळाल्या. गेल्यावेळेस २५ जागा लढवून २३ जागा जिंकणारी भाजप यावेळेस २८ जागांवर रिंगणात होती. मात्र यावेळेस भाजपला केवळ ०९ जागांवर विजय मिळविता आला असून गेल्यावेळेसच्या तुलनेत १४ जागा भाजपच्या कमी झाल्या आहेत. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळेस भाजपसोबत शिवसेना (शिंदे) आणि गट राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत असूनही महायुतीला निम्म्याही जागा जिंकता आल्या नाहीत.

Lok Sabha Election 2024 महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी
Lok Sabha Election 2024 महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी

२० हुन अधिक विद्यमान खासदार लढतीत पराभूत झाले असून १० हून अधिक विद्यमान खासदार निवडणूकीत विजयी ठरले आहेत. विदर्भ-मराठवाड्यात १४ जागांवर महाविकास आघाडी विदर्भ-मराठवाड्यातील १८ जागांपैकी केवळ चार जागांवर महायुती विजयी होऊ शकली. विदर्भात तीन तर मराठवाड्यात केवळ एक जागेवर महायुतीला विजय मिळाला. विदर्भाचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसने परत मिळवित लढलेल्या ७ पैकी ५ जागांवर विजय मिळविला, विदर्भातील १० पैकी ८ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली. हनुमान चालिसा पठणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणा-या नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी देऊनही महाविकास आघाडीने त्यांचा पराभव करीत हनुमान चालिसा प्रकरणाचा राजकीय सूड घेतला. बुलढाण्यात बहुरंगी लढत विद्यमान खासदार आणि शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी चौथ्यांदा विजय मिळविला.

मराठवाड्यात संभाजीनगरात सांदिपान भुमरे यांनी विजयी होत अनपेक्षित धक्का दिल्याने चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय भवितव्यावर जवळपास पूर्णविराम लागल्याचे मानले जात आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यातील लढतीचा निकाल रात्री उशिरापर्यंत लांबला. मराठवाड्यात भाजप एकही जागा जिंकू शकली नाही. काँग्रेस ३, शिवसेना (ठाकरे) गट ३, शिंदे गट एक असा निकाल लागला.
उत्तर महाराष्ट्रात ८ जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजप विजयी झाली तर उर्वरित सहा जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. विद्यमान केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरे येथून पराभूत झाले.

२० हुन अधिक विद्यमान खासदार लढतीत पराभूत झाले असून १० हून अधिक विद्यमान खासदार निवडणूकीत विजयी ठरले आहेत. विदर्भ-मराठवाड्यात १४ जागांवर महाविकास आघाडी विदर्भ-मराठवाड्यातील १८ जागांपैकी केवळ चार जागांवर महायुती विजयी होऊ शकली. विदर्भात तीन तर मराठवाड्यात केवळ एक जागेवर महायुतीला विजय मिळाला. विदर्भाचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसने परत मिळवित लढलेल्या ७ पैकी ५ जागांवर विजय मिळविला, विदर्भातील १० पैकी ८ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली. हनुमान चालिसा पठणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणा-या नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी देऊनही महाविकास आघाडीने त्यांचा पराभव करीत हनुमान चालिसा प्रकरणाचा राजकीय सूड घेतला. बुलढाण्यात बहुरंगी लढत विद्यमान खासदार आणि शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी चौथ्यांदा विजय मिळविला.

मराठवाड्यात संभाजीनगरात सांदिपान भुमरे यांनी विजयी होत अनपेक्षित धक्का ल्याने चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय भवितव्यावर जवळपास पूर्णविराम लागल्याचे मानले जात आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यातील लढतीचा निकाल रात्री उशिरापर्यंत लांबला. मराठवाड्यात भाजप एकही जागा जिंकू शकली नाही. काँग्रेस ३, शिवसेना (ठाकरे) गट ३. शिंदे गट एक असा निकाल लागला.
उत्तर महाराष्ट्रात ८ जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजप विजयी झाली तर उर्वरित सहा जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. विद्यमान केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरे येथून पराभूत झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news