मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहाजी बापूंची रूग्णालयात घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहाजी बापूंची रूग्णालयात घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती.

शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळ गाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती. आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असून ती पुन्हा एकदा धडधडावी यासाठी बापुंनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ही तोफ बिछान्यावर पडून नव्हे तर भर सभेत विरोधकांना चारही मुंड्या चित करताना दिसायला हवी, यासाठी बापुनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कुटूंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news