मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे राज्यात उष्णतेचासामना करावा लागत आहे. या दमट उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. एक मार्चपासून राज्यात २५१ जणांना उष्माघाताची लागण झाली आहे. सध्या धुळे, नाशिक आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढत असून, काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. १ मार्च ते २० मे पर्यंत राज्यात उष्णतेच्या लाटेत २५१ रुग्ण आढळले आहेत. यापैकी गेल्या २४ दिवसांत उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत उष्माघाताचा एकही रुग्ण नसला तरी ठाण्यात ६ तर पालघरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिल आणि मेमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.
उष्माघाताचे रुग्णांची नोंदणी मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. राज्यात उष्माघाताच्या २५१ रुग्णांची नोंद झाली असून, एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मार्चमध्ये ४०, १ ते २६ एप्रिलपर्यंत १४४ आणि २६ एप्रिल ते २० मे या कालावधीत ६७ रुग्ण आढळले आहेत.
कमी रुग्ण असलेले जिल्हे : भंडारा, हिंगोली, पालघर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण, रायगड, वसीम, बीडमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण, अमरावती, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण, जळगाव आणि अकोला येथे ५ रुग्ण आहेत रुग्ण आढळले आहेत. तसेच गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, वर्धा येथे प्रत्येकी सहा आणि पुण्यात आठ रुग्ण आढळले आहेत. या सहा जिल्ह्यांमध्ये लातूर, नंदुरबार या जिल्ह्यांव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरात उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
धुळे – 20, नाशिक – २८, जालना- 28, बुलढाणा – 22, परभणी – 12, धुळे – 20, सोलापुर – 18, नागपूर 11
उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, थंड ठिकाणी राहावे, योग्य कपडे परिधान करावेत, दिवसाच्या उष्णतेच्या वेळी कमीत कमी कामे करण्याचा प्रयत्न करावा, उन्हापासून, उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे.
डॉ. कैलास बाविस्कर, सहसंचालक , आरोग्य विभाग