उद्धव ठाकरेंनी ‘तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो’ बोलायचं बंद केलं : देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंनी ‘तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो’ बोलायचं बंद केलं : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो' ही गर्जना कालपर्यंत उद्धव ठाकरेंकडून आपण ऐकत होतो , पण नुकतीच इंडिया आघाडीची बैठक पार पडली. आणि त्यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी 'तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो' हे बोलायचं बंद केलं. आता ते नावदेखील घेत नाहीत ही खरोखर एक शोकंतिका आहे, अशी कडाडून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उमेदवारच्या प्रचारार्थ आज (दि. १७) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतींची सभा सुरू आहे. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घरी बसून सुरू होते. त्यांच्याकडून आपल्याला 'माझं कुटूंब माझी जबाबदारी' या पलिकडे आपल्याला काहीचं ऐकायला मिळालं नाही. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृवाखाली राज्य सरकारने अनेक कामे केली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने मुंबईचं परिवर्तन, अटल सेतू, मेट्रो, धारावीचं परिवर्तन अशी अनेक कामे मुंबईकरांसाठी केली आहेत. इंडिया आघाडी मुंबईकरांसाठी काय केलं हे सांगू शकतील का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , राज ठाकरे, पियुश गोयल, नारायण राणे, रामदास आठवले, जोगेंद्र कवाळे, अशिष शेलार, सुनिल तटकरे, आशोक चव्हाण हे उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news