Hingoli Municipal Council : मुख्याधिकारी अजय कुरवाडेंना तत्काळ निलंबित करा : आ. मुटकुळेंची मागणी | पुढारी

Hingoli Municipal Council : मुख्याधिकारी अजय कुरवाडेंना तत्काळ निलंबित करा : आ. मुटकुळेंची मागणी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा

हिंगोली विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीत असे म्हटले आहे की, हिंगोली नगरपरिषद (Hingoli Municipal Council) प्रभाग रचना प्रक्रियेमध्ये मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्याशी संगनमत करून काही राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करत आहेत.

मुख्याधिकारी कुरवाडे हे त्यांच्या मर्जीतील विशिष्ट राजकीय व्यक्तींना त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी, मर्जी प्रमाणे प्रभाग रचना आराखडा तयार करत असल्याचीही चर्चा शहरांत आहे. वास्तविक पाहता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही निःपक्षपातीपणे व गोपनीयरित्या पार पडायला हवी. मात्र काही राजकीय व्यक्ती मुख्याधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी याबाबत वारंवार ये जा करत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. (Hingoli Municipal Council)

याबाबत शासकीय निवासस्थानाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पहावेत अशीही त्यांनी यावेळी मागणी केली आहे. हिंगोली शहर हे माझे मतदारसंघ मुख्यालय असून, जनतेमध्ये मोठा असंतोष पसरत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या अशा पक्षपातीपणामुळे हेवेदावे वाढत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून, दोषी मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांना निलंबित करून निवडणूक प्रक्रियेतून दूर ठेवावे. आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यामार्फत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा

Back to top button