मुंबई : गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव | पुढारी

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव

मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हे आंदोलन रोखा तसेच आंदोलकांवर कारवाई करा, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर आठ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, या याचिकेवर शुक्रवारी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती सदावर्ते यांच्या वकिलामार्फत करण्यात येण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत आंदोलनाला हिंसक स्वरूप देणार्‍या आंदोलकांविरुद्ध कारवाईचे निर्देश द्या, अशी मागणी याचिकेत केली आहे.

हेही वाचा :

Back to top button