नूडल्सच्या पाकिटातून हिर्‍यांची, तर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी | पुढारी

नूडल्सच्या पाकिटातून हिर्‍यांची, तर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी

मुंबई : नुडल्सच्या पाकिटातून हिर्‍यांची तस्करी करणार्‍यास पोलिसांनी अटक केली. कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी संशयिताकडून सुमारे 2.2 कोटींचे हिरे जप्त केले. मुंबईहून बँकॉकला जाणार्‍या प्रवाशाकडे विमानतळावरील ट्रॉलीत नूडल्सच्या पाकिटात हिरे आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोलंबोहून मुंबई येताना एका महिलेने अंतर्वस्त्रात लपवून ठेवलेले 321 ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले.

गेल्या आठवडाभरात सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांंनी 4.5 कोटींचे सोने तर 2.2 कोटींचे हिरे जप्त केले. दुबई, अबुधाबी, बहारीन, दोहा, रियाध, बँकाँक, सिंगापूर आदी देशांतून सोन्याची तस्करी करणार्‍या दहा भारतीयांना गेल्या आठवडाभरात अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button