राज्य बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

Sunetra Pawar
Sunetra Pawar

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांना २५ हजार कोटी रुपयांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) क्लीन चिट देत निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड जरंडेश्वर को-ऑप शुगर मिल गुरू कमोडिटीकडून भाड्याने घेण्यामध्ये कोणतीही बेकायदेशीरता केलेली नाही, असे आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या क्लोजर अहवालात म्हटले आहे. तथापि, ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, गुरु कमोडिटी आणि जरंडेश्वर शुगर मिल्सने लीज अस्सल म्हणून सादर करण्यासाठी "कागदी व्यवहार" केला.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने 2020 मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. परंतु, त्यानंतर अजित पवार आणि त्यांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांची पुन्हा चौकशी करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या वर्षी जानेवारीमध्ये दुसरा अहवाल दाखल करून हा केस बंद करण्याची मागणी केली. कारण या प्रकरणात अजित पवार यांच्यासह कोणावरही कारवाई करण्याचा कोणताही पुरावा नाही.

तसेच आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांना क्लीन चिट देखील दिली, त्यांनी सांगितले की त्यांची बारामती ॲग्रो कन्नड साखर मिल खरेदी करताना आर्थिकदृष्ट्या सुदृढ होती आणि 'निधी वळवला गेला नाही.' त्यात त्यांचे पक्षाचे सहकारी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही क्लीन चिट देण्यात आली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news