मुंबई: मालाड येथील गिरनार अपार्टमेंटमध्ये भीषण आग: ८ जण जखमी | पुढारी

मुंबई: मालाड येथील गिरनार अपार्टमेंटमध्ये भीषण आग: ८ जण जखमी

मालाड, पुढारी वृत्तसेवा :  मालाड पश्चिमेतील ओर्लेम सुंदर गल्लीतील गिरनार अपार्टमेंटमध्ये आज (दि.१६) सकाळी १० च्या सुमारास भीषण आग लागली. यात ८  जण जखमी झाले आहेत. जखमींवर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. Mumbai

गिरनार बिल्डिंगच्या मीटर बॉक्सला भीषण आग लागली. ८ माळ्याच्या बिल्डिंगच्या प्रवेशाच्या ठिकाणी तळ मजल्यावर मीटर बॉक्स असल्याने बिल्डिंग मधील लोकांना बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाने आग विझवून अडकलेल्या 8 जणांना रुग्णालयात दाखल केले. Mumbai

कविता मेनिंजेस ( वय ५२), रेझिनॉर्ड डिसूझा (वय ७३), अँथनी मोहसिन (वय ४७), अँथनी फर्नांडिस (वय ६८),  लेविना मुकादम (वय ७३),  मार्शल मुकादम (वय ८०), विनिजॉय मुकादम (वय ४०),  मेरी जेमी ( वय ६६), हे  ८ जण धुरामुळे गुदमरले.  त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा 

Back to top button