मुंबई/पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. राज्यात विशेषतः पश्चिम विदर्भात गेल्या आठवड्यापासून गारपीट, अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला.
विदर्भाबरोबरच आता मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातही पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. पश्चिम विदर्भ आणि आसपासच्या भागात सध्या चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारीही विदर्भासह बहुतांश भागात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, मुंबई, ठाणे या भागात तीव्र उष्णतेची लाट सुरूच आहे. राज्यात सोमवारी मालेगाव शहराचे तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. अवकाळी पाऊस असला तरी राज्यात उष्णतेच्या झळा मात्र सुरूच आहेत.
हेही वाचा :