Anmol Bishnoi vs Salman Khan : यानंतर घराबाहेर गोळ्या झाडणार नाही; लॉरेन्सच्या भावाचा सलमान खानला इशारा

अनमोल बिष्णोई - सलमान खान
अनमोल बिष्णोई - सलमान खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉरेन्स बिश्नोईचा अमेरिकेत असलेला गँगस्टर भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यात त्याने अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. Anmol Bishnoi vs Salman Khan

अनमोल बिश्नोई यांने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ओम जय श्री राम, जय गुरुजी जांभेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला गेला. तर युद्ध योग्य आहे. सलमान खान, आम्ही तुम्हाला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे. जेणेकरून तुम्हाला आमची ताकद समजेल. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यानंतर घराबाहेर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील ज्यांना तुम्ही देव मानलात. त्यांच्या नावाने आम्ही दोन प्राणी पाळले ​​आहेत. आपल्याला जास्त बोलायची सवय नाही. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गोल्डी ब्रार ग्रुप, कला जथेडी ग्रुप, रोहित गोदरा ग्रुप. Anmol Bishnoi vs Salman Khan

दरम्यान, सलमान खानला काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अनेक धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. रविवारी पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हवेत तीन ते चार राऊंड गोळीबार केला. त्यानंतर तेथून त्यांनी पळ काढला. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. त्या गोळ्यांच्या खुणा अपार्टमेंटबाहेरही सापडल्या आहेत. एक गोळी त्याच्या बाल्कनीच्या जाळीलाही लागली आहे. या घटनेनंतर सलमानची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

Anmol Bishnoi vs Salman Khan : मुख्यमंत्र्यांच्या सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना

दरम्यान, वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज पहाटे ५ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ५ वेळा फायरिंग करून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असला तरी त्याची टोळी बाहेर असून गोल्डी ब्रारही बाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत याच टोळीने अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेनंतर  सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news